रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 85

  • 2.8k
  • 978

अध्याय 85 राज्याविषयी लक्ष्मणाची विरक्ती – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा आनंदसोहळा : श्रीरामाचें अभिषिंचन । आनंदमय त्रिभुवन ।भक्तवृंद सुखैकघन । आनंदें पूर्ण गर्जती ॥ १ ॥भद्रीं बैसला रघुनाथ । ब्रह्मांड सुखें दुमदुमित ।विनोदें श्रीरामाचे भक्त । रामसुखार्थ दाविती क्रिया ॥ २ ॥श्रीरामसुखें संपन्न । संतोषावया रघुनंदन ।अग्निक्रीडा मांडिली पूर्ण । औषध भरून रज तम ॥ ३ ॥ दारूकामाचे रूपकात्मक अनुपम सुंदर वर्णन : तीव्ररजतमांची औषधे । करोनि अग्नियंत्रें सन्नद्धें ।श्रीरामभक्तिआनंदें । क्रीडा विनोर्दे मांडिली ॥४ ॥सूक्ष्म ममतेची हवाई । पहिली आणियेली पाही ।वैराग्यवाती लावितां ठायीं । चिद्‌गगनीं तेही उसळली ॥ ५ ॥गुरुवाक्यें प्रज्याळिली । सद्विवेकें आंबुथिली ।लागतां हवाई जळाली