रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 83

  • 3.2k
  • 939

अध्याय 83 श्रीरामांना राज्याभिषेक – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ धन्य तो वाल्मीकिमुनिजन । धन्य धन्य त्याचें वचन ।अनागत रामायण । केलें-निरूपण शतकोटी ॥ १ ॥धन्य तें अयोध्याभुवन । धन्य धन्य तेथींचे जन ।धन्य तयांचे नयन । नित्य रघुनंदन देखती ॥ २ ॥धन्य भाग्य त्या भरताचें । नित्य चिंतन श्रीरामाचें ।प्रेम देखोनि निष्कर्षाचें । झालें स्वामीचें आगमन ॥ ३ ॥ रामराज्याभिषेकासाठी आलेल्यांची नामावली : त्याच्या राज्याचा उत्साहो । अभिषेकी कळवळलाहो ।भरतें मांडिला पहा हो । ऋषिसमुदावो मेळवोनी ॥ ४ ॥श्रीरामराज्याभिषिंचन । पाहूं आले सुरगण ।मरुद्‌गणेंसी पाकशासन । स्वयें आपण तेथें आला ॥ ५ ॥देवगुरु बृहस्पती । तेथे आला शीघ्रगतीं ।सनकादिक मुनिपंक्ती