रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 81

  • 3.2k
  • 947

अध्याय 81 श्रीराम- भरतभेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गुहकाचा भाव पूर्ण । भावे भेटला रघुनंदन ।भाव तेथें तिथे ज्ञान । विज्ञानेसी जाण सर्वदा ॥ १ ॥ न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृण्मये ।भावे हि विद्यते देवस्तस्माद्‌भावो हि कारणनम् ॥ १ ॥ भावार्थाचा महिमा : भावार्थी प्रेम आगळे । भावार्थे तत्व आकळे ।वैकुंठीचे-भाव बळे । सर्वकाळें भेटती ॥ २ ॥भावावीण व्यर्थ श्रवण । भावावीण व्यर्थ कीर्तन ।अर्थावबोध नाही पूर्ण । चित्त वळघे रान विषयाचें ॥ ३ ॥भावार्थावीण व्यर्थ ज्ञान । भावार्थावीण व्यर्थ ध्यान ।अंतरीं विकल्प नांदतां पूर्ण । ज्ञान ध्यान लटिकेंचि ॥ ४ ॥भावार्थावीण वृथा भक्ती ।