रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 79

  • 2.9k
  • 768

अध्याय 79 हनुमंत- भरत भेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥क्रिशमात्रमयोध्यायाश्चीरकृष्णाजिनाम्बरम् ।ददर्श भरतं दीनमृषिभिः सह वासिनम् ॥ १ ॥जटिलं मलदिग्धांगं भ्रातृव्यसनकर्पितम् ॥ २ ॥ हनुमंताला भरत कसा दिसला ? : अयोध्येहूनि क्रोशमात्र’ । नंदिग्राम भरतनगर ।तेथें येवोनि कपिकुंजर । पातला घर भरताचें ॥ १ ॥तंव वसिष्ठादि ऋषीश्वर । भरतासमीप थोर थोर ।व्रतस्थ झाले समग्र । वल्कलांबर कृष्णाजिनीं ॥ २ ॥तापसवेषी वनचर । कंदमूळफळाहार ।व्रतें धरियेलीं दुर्धर । कृशोदर पैं भरत ॥ ३ ॥अस्थि चर्म झालें एक । मांस आटलें सकळिक ।रुधिर शोषिलें निःशेख । पंजर देख उरलासे ॥ ४ ॥श्रीरामाचेनि स्मरणें जाण । भरतदेह वांचला पूर्ण ।तेणें भासे देदीप्यमान । जीवन