रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 78

  • 3.2k
  • 963

अध्याय 78 हनुमंत नंदिग्रामास गेला – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥भरद्वाज ऋषींनी श्रीरामांचे विमान पाहिले : विमानीं बैसोनी रघुनाथा । अति त्वरान्वित जातां ।तळी भरद्वाज अवचितां । आश्रमीं असतां देखिला ॥ १ ॥आश्रमी असतां भरद्वाज ऋषी । आश्चर्य देखिलें आकाशीं ।हेमच्छाया दशदिशीं । चौपासीं पसरली ॥ २ ॥रविचंद्रांतें लाजवीत । प्रकाश शीतोष्णातीत ।गगनीं काय असे जात । ऋषि मनांत विचारी ॥ ३ ॥निर्धारोनि पाहे नयनीं । तंव परिवारला वानरगणीं ।श्रीराम देखिला विमानीं । जनकनंदिनी अंकावरी ॥ ४ ॥सौमित्रासहित राम होये । सवें वानर कैचे हो हे ।राक्षसगणही दिसती पाहें । श्रीराम होये सर्वथा ॥ ५ ॥माझ्या श्रीगुरूच्या अनागता । श्रीराम न