रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 77

  • 2.6k
  • 858

अध्याय 77 श्रीरामांना अयोध्यादर्शन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीची प्रेमावस्था । देखोनियां रघुनाथा ।हर्ष दाटला निजचित्ता । उचलोनि तत्वता आलिंगिली ॥ १ ॥उठवोनियां जानकीसी । रामेश्वरदर्शन घ्यावयासी ।राम चालिला अतिप्रीतीसीं । विमान भूमीसीं उतरलें ॥ २ ॥ श्रीरामाचें विमान रामेश्वरी उतरताच ऋषीचे रामदर्शनार्थ आगमन : भूमीं उतरतां विमान । रामदर्शनालागून ।आली ऋषिमंडळी धांवोन । केलें नमन अति प्रीतीं ॥ ३ ॥अगस्तिलोपामुद्रासमवेत । ऋषी पातले समस्त ।त्यांते दोखोनियां रघुनाथा । नमन करीत लोटांगणीं ॥ ४ ॥भूमीं उतरतां विमान । श्रीरामदर्शनालागून ।तिहीं करोनियां उठवण । रघुनंदन नमियेला ॥ ५ ॥तेथे ऋषींचा जयजयकार । वानरवीरांचा भुभुःकार ।नादें कोंदलें अंबर । दिशा समग्र