रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 76

  • 2.6k
  • 861

अध्याय 76 श्रीरामेश्वरमहिमावर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारुतीस परतण्यास वेळ लागल्याने श्रीराम सचिंत : विश्वेश्वरदत्त लिंग । हनुमान घेवोनि सवेग ।उड्डान केलें अति चांग । गगन सांग आक्रमिलें ॥ १ ॥येरीकडे रघुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।कां पां नयेचि वायुनंदन । काय विघ्न पडिलेंसे ॥ २ ॥उपवासी वानरवीर । खेद क्षीण क्षुधातुर ।आम्हांसीं न घेतां फळाहार । वानर आहार न सेविती ॥ ३ ॥बापुडे हे गोळांगूळ । आहारेवीण झाले विकळ ।गात्रें जाहली बेंबळ’ । भ्रमती डोळे गरगरां ॥ ४ ॥यांसी आहार न देतां । सकळां होईल प्राणांत व्यथा ।रामाचा नेम आम्हां भोंवता । वानरां समस्तां मारिलें क्षुधा ॥ ५