अध्याय 75 शिवलिंगासह मारुतीचे आगमन – ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मुक्त करोनि जनस्थान । ब्राह्मणां दिधलें दान ।सुग्रीवासी किष्किंधाभुवन । सेतुबंधन सागरीं ॥ १ ॥अगाधबोध रघुनाथा । हें हनुमंतवचन ऐकतां ।संतोष झाला उमाकांता । होय सांगता पूर्ववृत्त ॥ २ ॥ श्रीशंकर मारुतीला विंध्याद्रीची कथा सांगतात : ब्रह्मपुत्र श्रीनारद । सर्वेंद्रियब्रह्मबोध ।ब्रह्मवीणासुस्वरनाद । नित्य आनंद ब्रह्मपदीं ॥ ३ ॥ब्रह्मानंदें डुल्लतु । ब्रह्मसृष्टीं विचरत ।भुवनें भुवन हिंडत । अधिकारियां देत परब्रह्म ॥ ४ ॥उन्मत्तांसीं करोनि दंड । स्वेच्छा विचरत ब्रह्मांड ।देखोनि विंध्याद्रि प्रचंड । आला नारद भेटीसीं ॥ ५ ॥येरू उठोनि अति प्रीतीं । लोटांगण घातलें क्षितीं ।पूजा करोनि नम्रवृत्तीं । स्वयें