रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 74

  • 2.9k
  • 1k

अध्याय 74 श्री शंकर – हनुमंत भेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचें निजचरित्र गहन । सांगतां सौमित्र विचक्षण ।ऐकती जानकी सावधान । सर्वांगश्रवण करोनी ॥ १ ॥धन्य श्रवणार्थीं सादर सीता । धन्य धन्य तो सौमित्र वक्ता ।धन्य चरित्र रामकथा । अनागतवक्ता वाल्मीकी ॥ २ ॥कलियुगीं धन्य जन ते । अखंड गाती रामचरित्रातें ।धन्य धन्य ते सादर श्रोते । कथामृत सेविती ॥ ३ ॥श्रवणद्वारें कथामृत । सेवितां अंतर निर्वृत ।प्रकटोनियां रघुनाथ । उद्धरीत जडजीवां ॥ ४ ॥श्रीरामाचें चरित्र गहन । क्रमें संपलें सेतुबंधन ।पुढे रामेश्वराचे आख्यान । वर्णी कोण साकल्यें ॥ ५ ॥अनंत कथा सेतुमाहात्म्यीं असती । तितुकी आकळावया कैंची