रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 69

  • 2.9k
  • 954

अध्याय 69 दशरथाचे समाधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व जानकी यांची युती कशी दिसली : जेंवी सुवर्ण आणि कांती । प्रभा आणि दिप्ती ।तेंवी सीता आणि रघुपती । स्वयें शोभती निजतेजे ॥ १ ॥कापूर आणि दृती । प्रकाश आणि ज्योती ।भानु आणि दिप्ती । तेंवी भासती एकरुप ॥ २ ॥साकरेमाजी गोडी देखा । सागरीं लहरींच्या झुळुका ।तेवी माजी रघुकुळटिळका । जनकदुहिता शोभत ॥ ३ ॥धात्याआंगी सावित्री । उमा शंकरजानूवरी ।रमा समीप मुरारी । तेंवी रावणारीजवळी जनकत्मजा ॥ ४ ॥जानकीयुक्त रघुनाथ । देखोनियां अति मंडित ।सदैव त्रैलोक्यीं समस्त । आनंदभरित पैं जाले ॥ ५ ॥ दिव्याच्या परिक्षेत सीता उत्तीर्ण झाल्यामुळे