अध्याय 67 जानकीचे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा सर्वत्र जयजयकार : बिभीषण राज्यधर । देखोनि वानर निशाचर ।अवघीं केला जयजयकार । नामें अपार गर्जती ॥ १ ॥नामें कोंदलें पाताळ । नामें व्यापिलें जगतीतळ ।नामें कोंदलें नभोमंडळ । ब्रह्मांडगोळ व्यापिला ॥ २ ॥नामें गर्जती माकडें । वर्णिती रामाचे पवाडे ।नाचती प्रेमें वाडेंकोडें । बिभीषणापुढें अति प्रीतीं ॥ ३ ॥श्रीराम दत्त तेजाकार । रावणमुकुट परिकर ।आणोनि बाणें सुग्रीव वीर । धरिलें छत्र रामदत्त ॥ ४ ॥तेणें शोभा अत्यद्भुत । बिभीषण राज्यमंडित ।ते देखोनि सुर समस्त । सुमनें वर्षत अति प्रीतीं ॥ ५ ॥करोनियां जयजयकार । नामें गर्जती सुरवर ।नभीं सिद्धांचा जयजयकार