रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 65

  • 4.2k
  • 912

अध्याय 65 मंदोदरी सहगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसा रावणाच्या वनिता । अतिशोकाकुळिता ।विलाप करिती समस्ता । दुःखाक्रांता रणरंगीं ॥ १ ॥मंदोदरी आली तेथ । अति दुःखें दुःखार्दित ।पडिला देखोनि निजकांत । विलाप करीत आक्रोशें ॥ २ ॥ तासां विलपमानानां तदा रावणयोषिताम् ।ज्येष्ठपत्‍नी प्रिया दीना भर्तारं समुदैक्षत ॥१॥दशग्रीवं हतं दृष्ट्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।पतिं मंदोदरी तत्र कृपणं पर्यदेवयत् ॥२॥ मंदोदरीकृत रावणशची स्तुती व शोक – विलाप : विष्णुसंभूत जे स्वयें । रचिली स्वहस्तें देवें ।चराचर मोहातें पावे । रुप स्वभावें देखतां ॥ ३ ॥जो त्रिकाळ आत्मज्ञानी । तो मोहला शूळपाणी ।ओळखवेना निजपत्‍नी । शंकर मनीं वेडावला ॥ ४ ॥अकळ भगवंताची माया ।