अध्याय 64 रावणस्त्रियांचा विलाप ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ : करोनिया रणकंदन । ससैन्य रणीं रावण ।स्वयें पाडिला आपण । उरलें सैन्य देशोधडी ॥ १ ॥एकीं दिगंतर लंघिलें । एकां कंठीं प्राण उरले ।एकां गात्रां कंप सुटले । एक निमाले आपधाकें ॥ २ ॥एकें झालीं भ्रमित । एकां सुटला अधोवात ।एकां मूत्रवृष्टि होत । प्राण सांडित उभ्यांउभ्यां ॥ ३ ॥एक होवोनि कासाविसी । रडत रडत रणभूमीसीं ।बोंब घेवोनि वेगेंसीं । आलीं लंकेसीं सांगत ॥ ४ ॥एक सांडिती लेणीं लुगडीं । एक तृण धरिती तोंडीं ।एकांचि वळली बोबडी । पडली मुरकुंडी एकांची ॥ ५ ॥ अनेकांची दीनवाणीने