रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 61

  • 3.8k
  • 1k

अध्याय 61 राम – रावण – युद्धवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची गर्वोक्ती व गर्जना : परिघें नमिलें रघुपतीं । तें न देखेच लंकापती ।अति गर्वाची गर्वोन्मती । अंधवृत्ती होवोनि ठेली ॥ १ ॥गर्वे गर्जत रावण । श्रीरामातें लक्षून ।झणें करिसी पलायन । दशानन देखोनी ॥ २ ॥वानरांचा आश्रय धरून । मजसीं करुं आलासि रण ।त्यांसहित तुज निवटीन । अर्धक्षण न लागतां ॥ ३ ॥आम्हां राक्षसांचें भक्ष । देखा मनुष्य प्रत्यक्ष ।वानरभार सावकाश । कोशिंबिरीस न पुरती ॥ ४ ॥ते तुम्ही आज मजसीं । रणीं भिडलां रणमारेंसीं ।तैं उबगलेती जगासी । पाहूं आतां पुरुषार्था ॥ ५ ॥स्त्रिये मारिलें ताटकेसी ।