रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 60

  • 3.2k
  • 987

अध्याय 60 रावणाने रामांचा ध्वज तोडला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मातलीचे रथासह आगमन व श्रीरामांना वंदन : मातलि सारथि विचक्षण । घातलें इंद्रा लोटांगण ।येरें देतां आज्ञापन । करी संयोजन रथाचें ॥ १ ॥रावण दुरात्मा चांडाळ । बंदी घातले सुर सकळ ।तेणें अत्यंत तळमळ । लागली प्रबळ मातलीसीं ॥ २ ॥आपुला स्वामी सुरपती । सेवा घेतो त्याचे हातीं ।तेथें येराची कवण गती । लंकापति भला नव्हे ॥ ३ ॥तेणें क्रोधें करोनि जाण । केलें रथसंयोजन ।शस्त्रास्त्रें सकळ भरुन । सामग्री दारुण घातली ॥ ४ ॥कवचें खड्गें अत्य्द्‍भुत । मंत्र तंत्र क्रियायुक्त ।रणसामग्री समस्त । रथ त्वरित सिद्ध केला ॥ ५