रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 59

  • 3.6k
  • 993

अध्याय 59 रावणाचे युद्धार्थ आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण सावध होऊन मंदोदरीला धीर देतो, सांत्वन करितो : निजमूर्च्छा सांवरुन । सावध झाला रावण ।तंव पुढें विझालें हवन । रावणें आपण देखिलें ॥ १ ॥सखळ यज्ञसामग्री । वानरीं केली बोहरी ।तें देखोनि दशशिरीं । क्रोध शरीरीं चढिन्निला ॥ २ ॥मंदोदरी स्वयें रडत । देखोनियां लंकानाथ ।स्वयें तीस शांतवीत । निजपुरुषार्थ बोलोन ॥ ३ ॥ साभिमानैर्वचोभिस्तां सांत्वयन्निदमब्रवीत् ।कींरोदिषि शुभे दीनं मायि जीवति मानिनि ॥१॥न मे किश्चित्समो युद्धे त्रिषु लोकेषु भामिनि ।सेंद्राः सुरगणाःसर्वे तिष्ठंति हि वशे मम ॥२॥किमल्पसारैः शक्योऽहं जेतुं वानरमानुषै ॥३॥ निजाभिमानें दशानन । मंदोदरीप्रति वचन ।करोनि तिचें शांतवन । स्वयें