रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 56

  • 3.7k
  • 1k

अध्याय 56 लक्ष्मण व बिभीषण यांची श्रीरामांना विनंती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूतांकडून अहिरावणवध ऐकून रावणाला चिंता : दूतवचनें रामचरित । अहिरावणाचा निजघात ।ऐकोनियां लंकानाथ । तळमळित अति दुःखी ॥ १ ॥मंदोदरी सीतेजवळी । पाठविली अति कुशळी ।अतियुक्तीं प्रबोधिली । कांही केलें तरी वश नव्हे ॥ २ ॥जरी युद्ध करुं समरांगणीं । तरी राम नाटोपे रणीं ।मस्तक पिटितां दशाननीं । कांही करणी चालेना ॥ ३ ॥ऐसा झाला चिंतातुर । काय करुं मी विचार ।तंव आठवला महामंत्र । झाला शंकर प्रसन्न ॥ ४ ॥पूर्वी रावणांसीं वरद । शिवें दिधला प्रसिद्ध ।तें आठवलें विशुद्ध । होम अगाध मांडिला ॥ ५ ॥करोनि शुद्ध