रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 53

  • 3.1k
  • 1k

अध्याय 53 महिरावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंत स्वतःची चिंता व्यक्त करुन मकरध्वजाचे साहाय्य मागतो : ऐकतां मगरीचें वचन । झालें हनुमंता समाधान ।देवोनि पुत्रासीं आलिंगन । निजविवंचन सांगत ॥ १ ॥आमुचा स्वामी श्रीरघुनाथ । निद्राकांत कटकांत ।वानर मेळिकारी निद्रिस्थ । राक्षसीं मत्त पैं केले ॥ २ ॥मोहनास्त्र सावधानता । घालोनियां तत्वतां ।मोहन केलें समस्तां । सुषुप्ति अवस्था लागली ॥ ३ ॥कपतयोद्धे राक्षस । संमुख न येतीच संग्रामास ।चोरोनियां श्रीरामास । पाताळास आणिलें ॥ ४ ॥पृथ्वी पाहतां समस्ता । न सांपडती सर्वथा ।पाताळासी आलों आतां । श्रीरघुनाथा पहावया ॥ ५ ॥तंव येथें शुद्धि लागली । तुम्हांसी भेटी झाली ।श्रीरामप्राप्तीची