रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 52

  • 3k
  • 966

अध्याय 52 हनुमंत – मकरध्वज भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी : अहिरावण महिरावण । धराया रघुनंदन ।करिते झाले विवंचन । सावधान अवधारा ॥ १ ॥पाताळ सांडोनि त्वरित । जाले रणभूमीसीं प्राप्त ।धरोनि न्यावया संधि पाहत । अहोरात्र सावध ॥ २ ॥ हनुमंताची प्रतिकारार्थ सिद्धता : येरीकडे वानरभारीं । दळ सज्जी कपिकेसरी ।सन्नद्धबद्ध द्रुमकरी । निजगजरीं हरिनामें ॥ ३ ॥हनुमान वीर निजभक्त । रामभजनीं सावचित्त ।करोनियां कुरवंडी जीवित । स्वामीस राखित अहर्निशीं ॥ ४ ॥राक्षस मायावी निश्चितीं । युद्धीं पावले उपहती ।धूर चोरिती अतर्क्यगती । म्हणोनि कपिपती राखित ॥ ५ ॥न म्हणे वेळ अवेळ ।