रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 50

  • 2.8k
  • 957

अध्याय 50 हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे श्रीरामांना आणि सर्वाना वंदन : रामस्मरणें लक्ष्मण । सवेग उठोनियां जाण ।नमियेला रघुनंदन । बिभीषण नमियेला ॥ १ ॥नमस्कारिलें सुग्रीवासी । नमन केलें अंगदासी ।नमन सकळ वानरांसी । सौ‍मित्रें सकळांसी नमियेलें ॥ २ ॥ साधु साध्विति सुप्रीतः सुषेणं प्रत्यपूजयत् ।उत्थितं भ्रातरं दृष्टवा रामो हर्षसमन्वितः ॥१॥परिष्वज्य च सौ‍मित्रिं सबाष्पस्वेदमब्रवीत् ॥२॥ श्रीरामानां आनंद : उठिला देखोनि लक्ष्मण । उल्लासे रघुनंदन ।आलिंगोन सुषेण । काय आपण बोलत ॥ ३ ॥तुझिया उपकारा उत्तीर्ण । सर्वथा न होईजे गा आपण ।सौ‍मित्रासी जीवदान । दाता तूं सुषेण झालासी ॥ ४ ॥ऐसा विनवोनि सुषेण । आलिंगिला