रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 49

  • 3.4k
  • 1.1k

अध्याय 49 लक्ष्मण शुद्धीवर आला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम शांत होतात : श्रीराम प्रार्थितां वानरगण । शरणागत बिभीषण ।सृष्टिघाता कळवळोन । केलें उपशमन क्रोधाचें ॥ १ ॥शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।काय बोलत सुग्रीवासी । सावकाशीं परियेसा ॥ २ ॥ प्रशांतिमगमत्कोपो राघवस्य महात्मनः ।भूयः शोकसमाविष्टो रामो दशरथात्मजः ॥१॥अब्रवीद्राघवो दीनः सुग्रीवं वानरेश्वरम् ।सुग्रीव गच्छ किष्किंधां सहवानरसेनया ॥२॥कृतं मित्रसहायं तु यदन्यैर्भुवि दुष्करम् ।अहं चाद्य महाबाहो यत्करिष्यामि तच्छृणु ॥३॥ श्रीरामांची सुग्रीवाकडे निर्वाणीची भाषा : पुढे घेवोनि लक्ष्मण । सुग्रीवातें बोलावोन ।अदीन परी दीनवचन । दशरथनंदन बोलत ॥ ३ ॥सुग्रीवा परीस विनंती । तूं अवंचक मित्रकार्यार्थीं ।तुझे उपकार किती । म्यां वचनोक्तीं