रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 47

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 47 भरत – हनुमान भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची राममय स्थिती : हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि बाणासीं ।आला नंदिग्रामासीं । जेथें भरतासीं निवास ॥ १ ॥भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित ।आचार्य भक्तीचा भरत । भरतें निर्मुक्त चराचर ॥ २ ॥भरते भक्ति विस्तारली । भरतें भक्ति प्रकाशिली ।भरतें पाल्हाळिली निजभक्ती ॥ ३ ॥भरत भक्तीचा निजठेवा । भरत भक्तीचा विसावा ।भरत भक्तीचा ओलावा । भक्तीच्या गांवा रिगम भरता ॥ ४ ॥भरतें सत्य सद्‌भावो । भरतें साचार अनुभवो ।भरतें प्रकट रामरावो । सर्वत्र पहा हो सर्वांसी ॥ ५ ॥भरतें आपंगिली भक्ती । भरतें वाढविली विरक्ती ।भरतें पाहिली निजशांती