रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 45

  • 3.5k
  • 1.1k

अध्याय 45 अप्सरेचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित कपीची ॥ १ ॥ राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां प्रसादतः ।एवमुक्तस्तु रामेण सुग्रीवेणांगदेन च ॥२॥सुवेलमभिसंरुह्य संपीड्याप्लुत्य वानरः ।जगाम सत्वरं श्रीमानुपर्युपरि सागरे ॥३॥ श्रीरामांचा हनुमंताला आशीर्वाद व आज्ञा : सवेंचि बोले रघुराजा । सवेग उठीं पवनात्मजा ।शीघ्र करोनि यावें काजा । बंधुराजा उठवावें ॥ २ ॥स्वस्थ असो तुझें चित्त । स्वस्थ असो जीवित ।अंग प्रत्यंग समस्त । कपिनाथ निजविजयी ॥ ३ ॥स्वस्ति असो तुजलागीं । कल्याण असो सर्वांगीं ।सर्वदा विजयी जगीं । तनु सर्वांगीं सदृढ