रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 44

  • 2.8k
  • 987

अध्याय 44 औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं दंडोनि रावणासी । सावध करावें सौ‍मित्रासी ।राम आला अति स्नेहेंसी । जीवीं जीवासीं जीवन ॥ १ ॥राम जगाचें जीवन । राम जीवाचें चिद्धन ।सखा आत्माराम आपण । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ २ ॥तोचि राम स्वयें आपण । वांचवावया लक्ष्मण ।कृपाळु संतुष्टला संपूर्ण । त्यासीं कल्पांती मरण असेना ॥ ३ ॥राम निजज्ञानें अति समर्थ । तोही वानरांचे विचारांत ।अनुसरला स्वयें वर्तत । अनुचरित लक्षूनी ॥ ४ ॥ विश्रम्य स्वस्थमालोक्य सुषेणं राघवोऽब्रवीत् ।एष रावणवेगेन लक्ष्मणः पतितो भुवि ॥१॥सर्पवच्चेष्टते वीरो मम शोकमुदिरयन् ॥२॥ लक्ष्मणाला मूर्च्छा आणि रामांचा शोक : भूत भविष्य वर्तमान