रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 43

  • 3.5k
  • 1.2k

अध्याय 43 लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली : लक्ष्मणें रणाआंत । ध्वज सारथी छेदून रथ ।रावण केला हताहत । संग्रामांत साटोपें ॥ १ ॥रणीं लक्ष्मणें केला विरथ । तो राग न मानी लंकानाथ ।बिभीषणें केला अश्वघात । त्यासी टपत मारावया ॥ २ ॥लक्ष्मण झालिया परता । करीन बिभीषणाच्या घाता ।तो सोडीना शरणागता । क्षणार्धता न विंसबे ॥ ३ ॥धीर न धरीच रावण । परता नव्हेचि लक्ष्मण ।बिभीषणावरी आपण । अति निर्वाण मांडिलें ॥ ४ ॥घोडे मारितां । वेगीं रथ सांडूनि जाण ।मारावया बिभीषण । करुनि उड्डाण धांविन्नला ॥ ५ ॥बिभीषण देखोनियां दृष्टीं ।