रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 42

  • 3k
  • 1.1k

अध्याय 42 रावणाच्या रथाचा भंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने रावणाचा क्रोध : इंद्रजिताचा करोनि घात । सौ‍मित्र विजयान्वित ।तें ऐकोनि लंकानाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥ १ ॥निकुंबळे विवराआंत । लक्ष्मणें जावोनि तेथ ।केला इंद्रजिताचा घात । प्रधान सांगत लंकेशा ॥ २ ॥लक्ष्मणा साह्य हनुमंत । प्रतापें रिघोनि विवरांत ।बाहेर काढितां इंद्रजित । मेघपृष्ठपर्यत वाढला ॥ ३ ॥इंद्रजित मेघपृष्ठीं गर्जत । लक्ष्मण नेवोनि स्वहस्तें तेथ ।मेघनादाचा केला घात । साह्य हनुमंत सर्वार्थी ॥ ४ ॥ऐकोनि इंद्रजिताचा घात । अरावण महामोहान्वित ।सिंहासनातळीं मूर्च्छित । पडे अकस्मात विसंज्ञ ॥ ५ ॥संज्ञा पावोनिया रावण । दहाही मुखीं करी शंखस्फुरण ।दीर्घस्वरें करी