रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 39

  • 2.7k
  • 1k

अध्याय 39 इंद्रजिताचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण व वानरसैन्यासह हनुमंत मेघपृष्ठी गेला : इंद्रजित जातां मेघपृष्ठी । हनुमान त्याची न सांडी पाठी ।निर्दळावया महाकपटी । उठाउठी पावला ॥ १ ॥करावया इंद्रजिताचा घात । लक्ष्मण घेवोनियां हातांत ।वेगें वाढला हनुमंत । मेघापर्यंत साटोपें ॥ २ ॥वानरसैन्यासमवेत । तळीं असतां शरणागत ।छळणें इंद्रजित करी घात । रक्षणार्थ कपि योजी ॥ ३ ॥बिभीषण लक्ष्मण । आणि समस्त वानरगण ।लोम तुटों नेदीं जाण । आंगवण पहा माझी ॥ ४ ॥पुच्छाचिया आंकोड्याआंत । वानर आणि शरणागत ।बैसवोनियां समस्त । वज्रकवचात राखिले ॥ ५ ॥येरीकडे हनुमंत । करावया इंद्रजिताचा घात ।खवळला रणाआंत । तोही