रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 38

  • 3.4k
  • 1.1k

अध्याय 38 इंद्रजिताचे मेघपृष्ठावर गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निकुंबिळेत वानरप्रवेश झाला तरी इंद्रजित ध्यानमग्न : वानर बिळीं प्रवेशोन । जालें इंद्रजितदर्शन ।बैसला आहे धरुन ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ १ ॥वानरीं आंसुडितांचि जाण । तो न सांडी प्रेतासन ।त्यांचें भंगेना तें ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ २ ॥घाय हाणितां दारुण । इंद्रजिताचें भंगेना ध्यान ।हातींचें न राहे अवदान । होमविधान जपनिष्ठा ॥ ३ ॥वानरवीरांचिया श्रेणी । शंख करिती दोनी कानीं ।इंद्रजित डंडळीना ध्यानीं । होमविधानीं सादर ॥ ४ ॥कष्टतांही वानरगण । ध्याना भंगेना अणुप्रमाण ।हातींचें न राहे अवदान । होमविधान खुंटेना ॥ ५ ॥तये काळीं बिभीषण । त्याचें भंगावया