रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 35

  • 2.6k
  • 1k

अध्याय 35 मकराक्षाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभ पडल्यावर निकुंभाचे रणांगणावर आगमन : सुग्रीवें झोंटधरणी । कुंभ पाडिलिया रणीं ।तें देखोनिया नयनीं । निकुंभ क्षोभोनी चालला ॥ १ ॥ निकुंभो भ्रातरं दृष्ट्वा सुग्रीवेण निपातितम् ।प्रदहन्निव कोपेन सुग्रीवं प्रत्यवेक्षत ॥१॥कृतसंग्राममालं च दत्तपंचांगुलं शुभम् ।आददे परिघं घोरं नगेंद्रशिखरोपमम् ॥२॥निकुंभो भूषणेर्भाति परिघेणायतेन च ।नगर्या विटपावल्या गन्धर्वनगरैरपि ॥३॥सहसैवामरावत्या सर्वैश्च भुवनैः सह ।निकुंभपरिघोद्‍भूतं भ्रमतीव नभस्थलम् ॥४॥ निकुंभाच्या परिघ आयुधाने वानरसैन्याची दाणादाण : कुंभ पडताचि रणीं । निकुंभ चालिला कोपोनी ।सुग्रीवा जाळिले नयनीं । क्रोधोन्मादीं अवलोकी ॥ २ ॥मागें बहुतां रणांगणीं । जेणें केलिया संग्रामश्रेणी ।जो दाटुगा अरिदळणीं । तो परिघ घेवोनि चालिला ॥ ३