अध्याय 33 रामलक्ष्मणांची शरबंधनांतून सुटका ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मवरदानाच्या पालनाकरिता रामलक्ष्मण शरबंधनात पडले : प्रतिपाळावया ब्रह्मवरदान । श्रीराम आणि लक्ष्मण ।शरबंधी पडोनि आपण। विसंज्ञपण दाविती ॥ १ ॥बहुरुपी प्रेताचें सोंग धरी । आपण सावध अंतरीं ।रामसौमित्र तयापरी । शरपंजरी सावध ॥ २ ॥शरबंधी बांधले दोघे जण । विकळ दिसती रामलक्ष्मण ।परी ते सबाह्य सावधान । प्रतापे पूर्ण पुरुषार्थी ॥ ३ ॥ब्रह्मयाचे वरदें देख । येतां शरबंधासंमुख ।इंद्रजित अथवा दशमुख । छेदील मस्तक श्रीराम ॥ ४ ॥यालागीं शरबंधासमोर । कोणी न येती निशाचर ।करित विजयाचा गजर । गेले समग्र लंकेसीं ॥ ५ ॥लागतां शरबंधाचे बाण । वानरांचा जावा प्राण ।करितां