रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 32

  • 2.9k
  • 1.2k

अध्याय 32 श्रीराम-लक्ष्मणांना शरबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अतिकाय वधामुळे वानरसैन्यांत हर्षकल्लोळ व रावणाचा शोक : अतिकाय तो अतिरथी । सौमित्र केवळ पदाती ।तेणें त्यासी पाडिले क्षितीं । वानर गर्जती हरिनामें ॥ १ ॥ प्रहर्षयुक्ता बहवश्च वानराः प्रबुद्धपद्मप्रतिमाननास्तदा ।अपूजयन्लक्ष्मणमिष्टभागिनं हते रिपौ भीमबले दुरासदे ॥१॥ जैसीं उत्फुल्लित पद्मकमळें । तैसीं वानरांचीं मुखकमळें ।स्वानंदें शोभती प्रांजळें । अतिकाय बळें मारलिया ॥ २ ॥अतिकाय तो अतिरथी । लक्ष्मणें मारिला पदाती ।तें देखोनि श्रीरघुपती । सौ‍मित्रा पूजित स्वानंदे ॥ ३ ॥स्वर्गी गर्जतीं सुरवर । नामें गर्जती वानर ।ऋषी करिती जयजयकार । विजयी सौ‍मित्र संग्रामीं ॥ ४ ॥रणीं मारितां राक्षसभार । शेष उरले निशाचर ।भेणें