अध्याय 30 देवांतक व त्रिशिर यांचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ नरांतकाच्या वधामुळे त्याचे पाचही पुत्रांचे रणांगणावर आगमन : अंगदें मारिला नरांतक । राक्षसदळी परम धाक ।पळोनियां वीरनायक । लंकेसंमुख निघाले ॥ १ ॥पळतां देखोनि राक्षसभार । कोपा चढला राजकुमर ।अवघे होऊन एकत्र । निशाचर परतले ॥ २ ॥ नरांतकं हतं दृष्ट्वा चुक्रुशुनैर्ऋतर्षभाः ।देवांतकजस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥१॥आरुढो मेरुसंकाशं वानरेंद्रं महोदरः ।वालिपुत्रं महाविर्यमभिदुद्राव वीर्यवान् ॥२॥भ्रातृव्यसनसंतप्तस्तदा देवांतको बली ।आदाय परीघं घोरमंगदं समभ्यद्रवत् ॥३॥रथमादित्यसंकाशं युक्तं परमवाजिभिः ।अस्थाय त्रिशिराश्चापि वालिपुत्रमुपाद्रवत् ॥४॥स त्रिभिर्मेघसंकाशैनैर्ऋतैस्तैरभिद्रुतः ।वृक्षमुत्पाटयामास महाविटपमंगदः ॥५॥ अंगद वीरशिरोमणी । नरांतक पाडिला रणीं ।तें देखोनि पांचही जणीं । आलें गर्जोनी संग्रामा ॥ ३ ॥त्यांहीमाजी तिघे