रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 27

  • 2.8k
  • 1.2k

अध्याय 27 कुंभकर्णावर सुग्रीवाचा विजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वये बोले श्रीरघुनंदन । सुग्रीव आणि कुंभकर्ण ।दोघांसी मांडलेंसे रण । सावधान अवधारा ॥ १ ॥ उत्पपात तदा वीरः सुग्रीवो वानराधिपः ।सशालहस्तः सहसा समाविध्य महाबला ॥१॥अति दुद्राव वेगेन कुंभकर्ण महाबलम् ।तमापतंतं संप्रेक्ष्य कुंभकर्ण प्लवंगमम् ॥२॥तस्थौ विवृत्तसर्वांगो वानरेंद्रस्य संमुखः ।कुंभकर्णं स्थितं दृष्ट्वा।सुग्रीवो वाक्यमब्रवीत ॥३॥विहताश्च त्वचा वीराः कृतं कर्म सुदुष्करम् ।सहस्वैकं निपातं मे शालवृक्षस्य राक्षस ॥४॥ हनुमंताच्या धर्मयुद्धनीतीमुळे कुंभकर्णाला आदर वाटतो : सुग्रीव कपिराज आपण । लक्षोनियां कुंभकर्ण ।सवेग करोनि उड्डाण । आला गर्जोन शालहस्ती ॥ २ ॥कुंभकर्ण अति विस्मित । मज उचलोनि हनुमंत ।होता गरगरां भोवंडित । तो कां न मरितां स्वयें