रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 23

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 23 रावण – मंदोदरी संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्णाची गर्जना युद्धाला जाण्याची सिद्धता : सन्नद्ध बद्ध सायुध पूर्ण । युद्धा निघतां कुंभकर्ण ।काय बोलिला गर्जोन । एकला मारीन अवघ्यातें ॥ १ ॥रामलक्ष्मणां करीन घात । वानर भक्षीन समस्त ।अंगद सुग्रीव हनुमंत । फळशाखार्थ गिळीन ॥ २ ॥ऐकोनि कुंभकर्णगर्जन । रावणा आलें अति स्फुरण ।नगरीं त्राहटिलें निशाण । युद्धा आपण निघावया ॥ ३ ॥ कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो लोकरावणः ।गंतुमैच्छतिक्रोधः सर्वसैन्येत संवृतः ॥१॥संग्राममभिकांक्षंतं रावणं श्रुत्य भामिनी ।तत्रोत्थाय ततो देवी नाम्ना मंदोदरी तथा ॥२॥माल्यवंतं करे गृह्य यूपाक्षसहिता तथा ।मंत्रिभिर्मंत्रतत्वज्ञैस्तथान्यैर्मंत्रिसत्तमैः ॥३॥छत्रेणाध्रियमाणेन अतिकायपुरःसरा ।चामरैर्वीज्यमानैश्च वीज्यमाना स्वलंकृता ॥४॥सेवार्थं मार्गविपुलं ध्वजमाल्योपशोभितम् ।उत्सारणं प्रकुर्वद्‌भिर्वेत्रझर्झरपाणिभिः ॥५॥ रावण