रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 19

  • 3k
  • 1.2k

अध्याय 19 रावणाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगाच्या अंती । नीळ मूर्च्छित पडिला क्षितीं ।रावण मिरवी यश कीर्ती । गर्वोन्नति विजयाची ॥ १ ॥ विसंज्ञं वानरं दृष्टवा रणोत्सुकः ।रथेनांबुदघोषेण सौ‍मित्रिमभिढुद्रुवे ॥१॥तमाह सौ‍मित्रिरदीनसत्त्वो विस्फारयंतई धनुरप्रमेयम् ।अवेहि मामद्य निशाचरेन्‍द्र न वानरांरत्वं प्रतियोद्धुमर्हसि ॥२॥स तस्य वाक्यं प्रतिपूर्णघोषं ज्याशब्दमुग्रं च निशम्य राजा ।आसाद्य सौ‍मित्रिमुपस्थितं तं रोषान्वितं वाक्यमुवाच रक्षः ॥३॥दिष्ट्यासि मे राघव दृष्टिमार्गं प्राप्तोऽन्तगामी विपरीतबुद्धिः ।अस्मिन्‍क्षणे यास्यसि मृत्युलोकं संछाद्यमानो मम बाणजालैः ॥४॥ नीळाला नेत असता लक्ष्मणाच्या आगमनामुळे रावण परतला : श्रीरामस्मरणें सुखसंपन्न । नीळ निजसुखें मूर्च्छापन्न ।त्यातें देखोनि विसंज्ञ । दशानन विचारी ॥ २ ॥वानरांचा सेनापती । रावणें आणिला रणख्याती ।ऐशी मिरवावया कीर्ती ।