रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 17

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 17 सुग्रीव मूर्च्छित पडतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रहस्त वधाची वार्ता ऐकून रावण स्वतः जाण्याचे ठरवितो : पूर्व प्रसंगीं रणाआंत । नीळे मारिला प्रहस्त ।ऐकोनियां लंकानाथ । अति आकांत पावला ॥ १ ॥रावणाचा अति आप्त । प्रधान सेनानी प्रहस्त ।त्याचा नीळें केला घात । लंकेआंत आकांत ॥ २ ॥ प्रहस्तस्य वधं श्रुत्वा रावणो भ्रांतमानसः ।राक्षसानादिदेशाथ राक्षसेद्रो महाबलः ॥१॥कार्या शत्रुषु नावज्ञा यैरिंद्रबलसूदनः ।सूदितः सैन्यपालो मे सानुयात्रः सकुंजरः ॥२॥सोऽहं रिपुविनाशाय विजयाया विचारयत् ।स्वयमेव गमिष्यामि रणशीर्ष तदद्‍भुतम् ॥३॥अथ तद्वानरानीकं रामं च सहलक्ष्मणम् ।निर्दहिष्यामि बाणौघैः शुष्कं वनमिवानलः ॥४॥ नीळें मारिला प्रहस्त । बोंब उठली लंकेआंत ।तें ऐकोनि लंकानाथ । जाला भ्रांत सक्रोधी ॥