रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 14

  • 2.8k
  • 1.1k

अध्याय 14 धूम्राक्षाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सर्पशरबंधातून सावध झाल्यावर श्रीरामाचे सैनिकांना आलिंगन : सर्पशरबंधापासून । सुटले राम लक्ष्मण ।दोघीं सज्जिलें धनुष्यबाण । ठाणमाणसाटोपें ॥ १ ॥सावध होवोनि रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।बिभीषण हनुमंत । कपि समस्त आलिंगी ॥ २ ॥एक एक वानरवीर । स्वयें आलिंगी रामचंद्र ।वानरीं केला भुभुःकार । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥ वानरसैन्याच्या रामनामाच्या गजराने रावाण भयभीत, दूतांकरवी शोध आणतो : रामनामाचा गजर । वानरीं केला अति सधर ।नामें दुमदुमिलें अंबर । दशशिर दचकला ॥ ४ ॥ तेषां तु तुमुलं शब्दं वानराणां तरस्विनाम् ।नर्दतां राक्षसैः सार्द्धं तदा शुश्राव रावणः ॥१॥उवाच रक्षसां श्रेष्ठः समीपपरिवर्तिनः ।ज्ञायतां