रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 11

  • 2.7k
  • 999

अध्याय 11 इंद्रजिताकडून श्रीरामांना शरबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचा मांत्रिक रथ अग्नीतून बाहेर आल्यवर रणामध्ये आगमन : पूर्वप्रसंगी इंद्रजित वीर । होम करुनी अभिचार ।शस्त्रें पावला रहंवर । तेणें तो दुर्धर खवळला ॥ १ ॥अभंग रथ अश्व अमर । रथीं दिव्यास्त्रसंभार ।ऐसा पावोनि रहंवर । रणीं जावया निघाला ॥ २ ॥बैसोनि तया रथावरी । अदृश्य इंद्रजित गगनांतरीं ।येतां रणभूमीवरी । देख जुंझारी नरवानर ॥ ३ ॥ स ददर्श महावीर्यस्तावुभौ रामलक्ष्मणौ ।क्षिपंतौ शर जालानि कपिमध्ये व्यवस्थितौ ॥१॥स तु वैहायसं प्राप्य रथं तौ रामलक्ष्मणौ ।आचचक्ष रणे तस्मिन्विव्याध निशितैः शरैः ॥२॥तौ तस्य शरवेगेन पतितौ भ्रातरावुभौ ।गृहित्वा धनुशी व्योम्नि घोरान्मुमुचतुः शरान् ॥३॥ देखिले