रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 7

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 7 अंगदाकडून रावणाची निंदा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण : अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला तो लंकेसीं ।प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासीं ते ऐका ॥ १ ॥ सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीमद्रावणमंदिरम् ।ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैःसह ॥१॥ततस्तस्याविदूरेण निपत्य हरिपुंगवः ॥२॥ सभासद व रावणावर त्याचा परिणामः रावणसभेपुढें जाण । आलें अंगदाचें उड्डाण ।तेणें दचकला दशानन । कंपायमान भयभीत ॥ २ ॥पडतां अंगदाची उडी । लंका अत्यंत हडबडी ।दडाल्या वीरांचिया कोडी । जालीं बापुडीं राक्षसें ॥ ३ ॥कराव्या अवघ्यांचा घात । पुढतीं आला रें हनुमंत ।ऐसा वळसा लंकेआंत । अति आकांत राक्षसां ॥ ४ ॥कपिभयें भयभीत । रावणसभा पैं समस्त ।जैसें