रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 6

  • 2.7k
  • 1.2k

अध्याय 6 शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा : पूर्वप्रसंगीं रणांगणीं । वानरीं मारिल्या वीरश्रेणी ।रुधिर प्रवाह देखोनि धरणीं । श्रीराम मनीं कळवळला ॥ १ ॥ सर्व बंदोबस्त करुन नंतर पुढील योजनेचा बेत : कृपा उपजली रघुनाथा । एकाचिया अपकारता ।करुं नये सकळांच्या घाता । राजधर्मता हे नव्हे ॥ २ ॥सुग्रीवराजा आणि जांबवंत । अंगदादि वानर समस्त ।नळनीळादि हनुमंत । शरणागत बिभिषण ॥ ३ ॥ राघवः सन्निवेश्यैवं स्वसैन्यं रक्षसां वधे ।संमंत्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनःपुनः ॥१॥आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्ववित् ।बिभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन् ॥२॥ दुर्गपरिधी द्वाबंध । करावया राक्षसांचा वध ।सैन्य ठेविलें सन्नद्ध । वीर विविध आतुर्बळी