रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 1

  • 3.5k
  • 1.2k

युद्धकांड अध्याय 1 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उदार गंभीर सुंद्रकांड । तें संपवूनि अतिशयें गोड ।पुढां उठावलें युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ १ ॥ रामायणाचे महत्व त्यातील परमार्थ : वाखाणावया युद्धकांड । माझें केंवी सरतें तोंड ।तरी जनार्दनकृपा अखंड । जे कांडे कांड अर्थवी ॥ २ ॥रामायणींचा सखोल अर्थ । वक्ता जनार्दन समर्थ ।सबाह्य परिपूर्ण रघुनाथ । ग्रंथ परमार्थ श्रीराम ॥ ३ ॥रामायणींचें निजसार । क्षरीं कोंदलें अक्षर ।पदापदार्थ चिदमिन्मात्र । परम पवित्र रामकथा ॥ ४ ॥कथेजाजील कथार्थ । सबाह्य कोंदला रघुनाथ ।हाचि ग्रंथींचा परमार्थ । निजात्मस्वार्थ साधका ॥ ५ ॥ एकनाथांचे आत्मनिवेदन –