रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 41

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 41 रामसैन्याचे समुद्रोल्लंघन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला घेऊन लंकेच्या वाटेला लागतात : नळें बांधिला सेतु समाप्त । यालागीं म्हणती नळसेत ।परी तो श्रीरामपुरूषार्थ । जाला विख्यात तिहीं लोकीं ॥ १ ॥सेतु जालिया समाप्त । सुग्रीव संतोषें डुल्लत ।वंदोनियां श्रीरघुनाथ । स्वयें बोलत स्वानंदें ॥ २ ॥समुद्रीं लाभली पायवाट । आमचे चुकले परम कष्ट ।आता लंका करीन सपाट । दशकंठ वधोनि ॥ ३ ॥प्रधान सेनानी सपरिवार । राक्षसांचे भार संभार ।रणीं मारीन दुर्धर वीर । तरी किंकर मी तुझा ॥ ४ ॥सेतु होतांचि समाप्त । लंका जाली हताहत ।रणीं निमेल लंकानाथ । संदेह येथ