अध्याय 35 बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले श्रीराम जगदानंदकंद । श्रीराम सच्चिदानंद ।श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाहीं भवबंध स्मरणें तुझ्या ॥ १ ॥वानरसेनासंभार । पावोनियां समुद्रतीर ।कटक उतरलें समग्र । श्रीरामचंद्रासमवेत ॥ २ ॥ रावणमाता कैकसीची चिंता : येरीकडेलंकेआंत । नगर जाळोनि गेला हनुमंत ।तेणें कैकसीस आकांत । राक्षसां अंत दृढ आला ॥ ३ ॥कैकसी रावणाची जननी । लंकागडदाहो देखोनि ।परम दुःखित होय मनीं । स्त्रवतीं नयनीं अश्रुधारा ॥ ४ ॥ कैकसी बिभीषणाकडे जाऊन रावणाचीअपकृत्ये व त्याचे घोर परिणाम त्याला सांगते येवोनियां बिभीषणापासीं । निजदुःख सांगें त्यासी ।मरण आलें रावणासी । राक्षसांसी