रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 33

  • 3.4k
  • 1.1k

अध्याय 33 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणासमोर मारुती पुच्छासन मांडून बसतो त्यामुळे रावण भयभीत होतो रावणसिंहासनासमान । घालोनियां पुच्छासन ।हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १ ॥जैसा सिंहापुढें गजाचा दर्प । कीं गरूडापुढें कांपती सर्प ।तैसा देखोनि कपिप्रताप । महाकंप रावणा ॥ २ ॥ बिभीषण व इंद्रजित रावणास सूचना करितात जंव रावण देखे भयभीत । तंव बिभीषण इंद्रजित संयुक्त ।लंकेशासी बुद्धि सांगत । कीं अवध्य हनुमंत सर्वथा ॥ ३ ॥मारूं जातां हनुमंतासी । तेणें गांजिलें महावीरांसी ।पुच्छें निर्दळिलें सैन्यासी । तो कपि कोणासी नाटोपे ॥ ४ ॥तरी बुझवावया हनुमंता । श्रीरामा अर्पावी सीता ।आणि शरण रिघालिया रघुनाथा ।