रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 32

  • 3.1k
  • 1.2k

अध्याय 32 हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासीं स्वयें सांगत ।पुढारां वाचीं ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥ १ ॥राक्षसदांतांचिया रासी । पाडोनि केलिया रणभूमीसीं ।पुढें काय केलें लंकेसीं । तें मजपासी परिसवीं ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुग्रीवासी आल्हाद पोटीं ।हर्षल्या वानरांच्या कोटी । कथाकसवटी ऐकावया ॥ ३ ॥वानरांच्या निजकोडी । सभा बैसली परवडी ।हनुमंताची प्रतापप्रौढी । अति आवडीं ऐकावया ॥ ४ ॥हनुमंताची प्रतापकीर्ती । वाचितां लक्ष्मणा परम प्रीती ।अनुलक्षोनि श्रीराममूर्ती । पत्र प्रयुक्ती वाचित ॥ ५ ॥ इंद्रजिताचा पाडाव करून हनुमंत आपली शेपटी आवरून बसला झाडोनि इंद्रजिताचा पादाडा