रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 27

  • 3.7k
  • 1.3k

अध्याय 27 हनुमंतपराक्रमवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन धन्य धन्य तें ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता हनुमंत ।सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥ १ ॥सौमित्र वाची ब्रह्मलिक्जित । ऐकतां पत्रिकेचा अर्थ ।श्रीराम स्वानंदे डुल्लत । हनुमंतचरित्र परिसोनी ॥ २ ॥शुद्धि न लभे सीता सती । कळी लाविली लंकेप्रती ।सभा नागविली रात्रीं । हनुमंत ख्याती तें ऐका ॥ ३ ॥हनुमंताचें आचारित । अचळ समूळ समस्त ।ब्रह्मयानें लिहिलें ब्रह्मलिखित । सावचित्त अवधारा ॥ ४ ॥ गुप्त राहून हनुमंताने नगराता केलेला हलकल्लोळ गुप्त राहोनि नगरद्वारीं । वानरचेष्टा नानापरी ।कलहो लाविला निशाचरीं । कपिकुसरी ते ऐका ॥ ५ ॥पुच्छीं