रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 26

  • 3.4k
  • 1.2k

अध्याय 26 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।हें जाणोनि श्रीरघुपती । स्वयें प्रश्नोक्तीं चालवित ॥ १ ॥आदरें पुसें श्रीरामचंद्र । हनुमंता तूं वनचर ।कैसेनि तरलासी सागर । सत्य साचार मज सांगें ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामांचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।श्रीरामप्रतापमहिमान । सनुद्रतरण वानरा ॥ ३ ॥श्रीरामनामाच्या उच्चारें । जड मूढ तरती भवसागर ।राममुद्रांकित वानर । तेणें परपार पावलों ॥ ४ ॥रामनामाचा कडकडाट । भवसमुद्रीं पायवाट ।पायरी करोनि वैकुंठ । होती प्रविष्ठ परब्रह्मीं ॥ ५ ॥जे रामनामांकित नर । त्यांतें बुडवूं न शके सागर ।श्रीराममुद्रांकित वानर । परपार पावलों