रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 25

  • 3.5k
  • 1.3k

अध्याय 25 श्रीराम – अंगद संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीतम्हणून श्रीरामास चिंता वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला वानर गेले दक्षिणेसी । मर्यादा लोटली तयांसी ।कोणी नाणिती सीताशुद्धीसी । श्रीरामासीं अति चिंता ॥ १ ॥मजसीं करूनि एकांत । मुद्रा घेवोनि गेला हनुमंत ।तो कां नयेचि पां त्वरित । अति संचित श्रीराम ॥ २ ॥हनुमंत कार्यकर्ता । मजही हा भरंवसा होता ।तोहि न येचि वाट पाहातां । परम चिंता लागली ॥ ३ ॥ऐसी श्रीरामाची चिंता । कळों सरली त्या हनुमंता ।शुद्धि सांगावया सीता । होय निघता अति शीघ्र ॥ ४ ॥श्रीरामाची परम