रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 22

  • 3.1k
  • 1.3k

अध्याय 22 गजेन्द्रउद्धार व हनुमंताचे श्रीरामदर्शनार्थ पुनरागमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ह्रदयीं अंतरात्मा सर्वज्ञ । त्याचेनि बुद्धिंद्रिये सज्ञान ।तेणें काया वाचा मनें नमन । अनन्य शरण गजेंद्र ॥ १ ॥भगवंतासी अनन्य शरण । होतां पालटे देहचिन्ह ।इंद्रियांचे विपरीतज्ञान । तेंहि लक्षण अवधारा ॥ २ ॥अनन्यत्वीं मन उन्मन । चित्त होय चैतन्यघन ।बुद्धि होय समाधान । अहंता संपूर्ण सोहंत्वी विरे ॥ ३ ॥तेव्हां भूतें होती चिदाकार । विषय होती तन्मात्र ।अनन्यशरणत्वाचें सूत्र । संसारचरित्र परब्रह्म ॥ ४ ॥होवावया अनन्य शरण । पाहिजे भाग्य सत्त्वसंपन्न ।तेणें भाग्यें गजेंद्र गहन । करितो नमन भगवंता ॥ ५ ॥ओंकार ब्रह्मरूप पूर्ण । त्यासी प्रकाशी चैतन्यघन