अध्याय 21 गजेन्द्राचे आख्यान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहनाचा परिणाम : श्रीरामभक्तांचे महिमान । अगाध गहन अति पावन ।हनुमंतें केले लंकादहन । ओंतिली संपूर्ण सुवर्णाची॥ १ ॥रामभक्त करिती कंदन । तें कंदन होय सुखसंपन्न ।ऐसें भक्तीचें महिमान । कृपा संपूर्ण रामाची ॥ २ ॥हनुमंतें जाळिलें लंकेसीं । नव्हे काळी कोळसा मसी ।सुवर्ण ओतिलें चौपासीं । पीतप्रभेसीं शोभत ॥ ३ ॥करितां लंकेचें दहन । लंका ओतिली सुवर्ण ।याचे मूळ मुख्य कारण । गजोपाख्यान अवधारा ॥ ४ ॥ गजेन्द्र उद्धाराचे आख्यान : भगवंताचें कृपाळुपण । नामस्मरणाचें महिमान ।गजेन्द्राचें उद्धरण । प्रसंगें पूर्ण सुवर्णमय लंका ॥ ५ ॥चालतां कथा रामायण । त्यामाजी गजेंद्रोद्धरण